Posts

Showing posts from February, 2023

सधन लाभार्थ्यांनो अन्नधान्य अनुदान योजनेतून बाहेर पडा; जिल्हाधिकाऱ्यांचे निमा अरोरा यांचे आवाहन

सधन लाभार्थ्यांनो अन्नधान्य अनुदान योजनेतून बाहेर पडा; जिल्हाधिकाऱ्यांचे निमा अरोरा यांचे आवाहन अकोला : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमानुसार पात्र असलेल्या अंत्‍योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्य सवलतीचा लाभ दिला जातो. परंतु ज्या पात्र लाभार्थ्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्याची आवश्यकता नाही, अशा सधन नोकरदार, व्यवसायी व शेतकरी लाभार्थ्यांनी स्वेच्छेने अन्नधान्य अनुदान योजनेतून बाहेर पडा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.  राज्यामध्ये दि. 1 फेब्रुवारी 2014 पासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत विविध अटीनुसार पात्र असलेल्या अंत्‍योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका प्रति माह 35 किलो व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती प्रतिमाह पाच किलो अन्नधान्याचा सवलतीच्या दराने लाभ देण्यात येतो. जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या शिधापत्रिकाच्या आधार सीडींग मुळे योजनेअंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ घेण्याकरिता योग्य लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. आधारसीडींग मुळे अपात्र, दुबार, स्थलांतरित व